पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: दोन पतींमधील आपापसातील वादातून आधीच्या पतीने विद्यमान पतीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील महाल परिसरातील नवाबापुरा येथे सोमवारी सकाळी घडली. या हल्ल्यात आकाश ढोमने हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश वानखेडे असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या महितीनुसार, एका महिलेचा आधीचा पती गणेश वानखेडे आणि विद्यमान पती आकाश ढोमने यांच्यात मुलाचा योग्य सांभाळा केला जात नाही या कारणावरून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी या वादाचे पर्यवासान हिंसाचारात झाले. गणेशने आकाशवर धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आकाश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्कूटरवरून पळाला. बडकस चौक परिसरात पोहोचल्यानंतर जखमी अवस्थेत तो स्कूटरवरून उतरला आणि ऑटो रिक्षा पकडून रुग्णालयात गेला. या दरम्यान त्याची स्कूटर आणि रस्ता रक्ताने माखला होता.
ज्या बडकस चौकात जखमी आकाशने ऑटोरिक्षा पकडली, ते ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आरएसएस मुख्यालयाजवळ एका व्यक्तीवर हल्ला अशा अफवा आणि मेसेज वेगाने व्हायरल होऊ लागले.
मात्र, नागपूर पोलिसांनी या अफवांचे तातडीने खंडन केले आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केले की, ही घटना आरएसएस मुख्यालयाजवळ घडलेली नसून कौटुंबिक वादातून नवाबपुरा परिसरात घडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.