Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Breaking News: गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं; अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या, परिसरात खळबळ

Nashik Crime News: अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात रविवारी (१० मार्च) रात्रीच्या सुमारास घडली.

Satish Daud

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

Nashik Latest Crime News

अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात रविवारी (१० मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काठे असं मृत माजी सैनिकाचं नाव आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चेतन घडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या गोळीबारात अमोल काठे यांचा भाऊ कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमोल काठे हा माजी सैनिक असून त्याचे चेतनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. (Latest Marathi News)

याची कुणकुण आरोपी चेतनला लागली होती. त्याने पत्नीला जाब विचारला असता, आपण फारकत घेऊ असं चेतनच्या पत्नीने त्याला सांगितलं. अमोलमुळे संसार मोडल्याचा राग चेतनच्या मनात होता. याच रागातून त्याने रविवारी रात्री अमोलचे घर गाठले.

यावेळी अमोल आणि चेतन यांच्यात शहरातील शंकर मार्गावरील महादेव पार्क परिसरात वाद झाला. मृत अमोल याने चेतनला मारण्यासाठी बंदूक आणली होती. हीच बंदूक हिसकावून आरोपीने अमोलवर गोळीबार केला. या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपी चेतनने मधस्थी करण्यासाठी आलेल्या अमोलचा भाऊ कुंदन याला देखील आरोपीने मारहाण केली. या मारहाणीत कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी चेतनला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT