shivsena & bjp Saam TV
महाराष्ट्र

BJP-Shivsena: 'अजूनही शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं सर्वांना वाटतंय'

''शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेल्याने जनता आणि शिवसैनिकांन मध्ये नाराज असुन अजूनही सर्वांना वाटत आहे की शिवसेनेनी भाजप बरोबर जावे.'

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अजूनही शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं सर्वांना वाटतं असल्याच वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबई महानगरपालिकेत (BMC) रिपब्लिकन पक्षाला (Republican Party) 35 ते 40 जागा मिळाव्या असा आमचा प्रयत्न असुन यावेळी मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून हिसकून घेतला शिवाय राहणार नाही असंही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathavale) म्हणाले ते आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असुन दौऱ्या दरम्यान आठवले यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर यावेळी टीका केली.

आम्हाला राज्यातील सरकार पाडायचे नाही -

ते म्हणाले, 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (NCP and Congress) बरोबर गेल्याने जनता आणि शिवसैनिकांन मध्ये नाराज असुन अजूनही सर्वांना वाटत आहे की शिवसेनेनी भाजप बरोबर जावे. महाविकास आघाडी सरकार मधील आमदारांनावर कारवाई करून आम्हाला राज्यातील सरकार पाडायचे आहे, असा आरोप आमच्यावर केला जातोय. या आरोपात काही तथ्य नसल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक चांगला माणूस असुन चांगला प्रवक्ता आहे. मात्र त्यांचा जमिनीचा व्यवहार चांगला नाही. ईडीला मलिक यांच्या विरोधात पुरावे मिळाले असल्याने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या मध्ये आमच्या भाजप सरकारचा काही संबंध नसल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT