बीड : आमचं शासनात विलीनीकरण करा, ही मागणी घेऊन गेल्या आठ दिवसांपासून, एसटी कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व डेपो बंद ठेवून, बेमुदत संप सुरू केलेला आहे. आता या आंदोलक संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय. बीड आगारातील सहा कर्मचाऱ्यांना आज निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे.
हे देखील पहा :
मात्र, ही नोटीस आल्यानंतर कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहेत. यावर नोटीस आलेले रियाज पठाण म्हणाले, की गेल्या 8 दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. माझ्या कुटुंबात आई-वडील मूलबाळ आहेत, आमची एकच मागणी आहे, की आमचं शासनात विलीनीकरण करा. यावर तोडगा काढायचा सोडून प्रशासनाने मला बक्षीस म्हणून निलंबनाची नोटीस दिलीय.
मात्र, ही प्रशासनाची कारवाई किरकोळ असून "आम्हाला फासावर लटकवले तरी आता माघार घेणार नाहीत". जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार नाही. असा इशारा निलंबनाची नोटीस आल्यानंतर एसटी कर्मचारी पठाण रियाज यांनी दिला आहे. तर प्रशासनाने असे पाच सहा लोकांना निलंबित करण्यापेक्षा, आमच्या बीड आगारातील 425 कर्मचाऱ्यांना एक सोबत निलंबित केलं तरी चालेल, मात्र या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही असा संतप्त इशारा रमेश खेडकर यांनी दिलाय.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.