Cm Eknath Shinde on Maharashtra Rain Alert Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा... मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिवांना निर्देश

State Cabinet Meeting: दरड कोसळण्याच्या घटनांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत; प्रतिनिधी...

Irshalwadi Landslide: खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी गावावर काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये दर काही वर्षांनी भूस्खलनाच्या घटना घडत असतात. त्यामुळे पावासाळा आला की याच परिसरातील नागरिकांना भूस्खलनामुळे धोका निर्माण होतो.

या घटनेनंतर राज्य सरकारनेही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दरडग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दरडग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले. तसेच मागील काही वर्षात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, खालापूरजवळच्या इर्शाळगडाच्या (Irshalgad) पायाथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT