पोलीस पथकावर अतिक्रमण धारकांचा हल्ला; दोघांना घेतलं ताब्यात Saam Tv
महाराष्ट्र

पोलीस पथकावर अतिक्रमण धारकांचा हल्ला; दोघांना घेतलं ताब्यात

यामध्ये २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्ताला आलेल्या पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकावर २ अतिक्रमण धारकांनी हल्ला केल्याची घटना लोणी ता. जामनेर या ठिकाणी आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील पहा-

लोणी या ठिकाणी आरोग्य केंद्रासमोर अतिक्रमण काढत असताना बंदोबस्ताकरिता हे पोलीस पथक या ठिकाणी आले होते. ग्रामपंचायत कर्मचारी नोटीस वाचून दाखवत असतांना अतिक्रमण धारकांनी निरीक्षक अरुण धनवडे आणि पथकावर हल्ला चढविला आहे. इतर पोलिसांनी त्यांना आवरले. धनवडे यांना मुकामार देखील लागला आहे.

लोणी या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आपल्यासह पोलीस पथक बंदोबस्ताकरीता या ठिकाणी आले होते. अतिक्रमण धारकांना समजून सांगत असतानाच त्यांनी माझ्यासह पथकावर हल्ला चढवून मारहाण करण्यात आली आहे. मुकामार देखील लागला आहे. अतिक्रमण धारकांना ताब्यात घेऊन पुढील कडक कारवाई करण्यात येत आहे. - अरूण धनवडे, पोलीस निरीक्षक, पहूर, ता.जामनेर.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'ससून'मधील मैत्री, अचानक काहीतरी बिनसले; तरुणाकडून तरुणीची हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Mokshada Ekadashi: वैकुंठाचे दार उघडणारा दिवस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या मोक्षदा एकादशीचे महत्व अन् उपवासाची पद्धत

Pune Bomb Threat: पुण्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल, धमकीनं पोलिसांची झोप उडाली

मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावरून शिंदेसेना–भाजपात राडा|VIDEO

Maharashtra Live News Update: रविवार सुट्टीच्या दिवशी शिवसेना उबाठाची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT