kamlu, balaghat, naxals saam tv
महाराष्ट्र

Balaghat Forest : हॉकफोर्सची कामगिरी, बालाघाटच्या जंगलात कमलू नक्षलवादी ठार

कमलू हा 18 वर्षाच्या असतानाच नक्षलवादी बनल्याची चर्चा हाेती.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News : गोंदिया सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार करण्यात बालाघाट पोलीसांना यश आले आहे. तब्बल १४ लाखांचे होते बक्षीस त्या नक्षलवाद्यावर होते अशी माहिती पाेलीसांकडून प्राप्त झाली.  (Maharashtra News)

गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या समस्येशी झगडत असलेल्या बालाघाट जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादाच्या निर्मूलनात व्यस्त असलेल्या हॉकफोर्सला २९ सप्टेंबरला आणखी एका मोठ्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले.

२५ वर्षीय मलाजखंड दलमचा नक्षलवादी कमलू हा हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. कमलू वर १४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

हॉकफोर्सचे जवान जंगलात शोध मोहीम राबवित असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. हे सर्व नक्षलवादी मलाजखंड दलमचे सक्रिय सदस्य होते. या चकमकीत नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हॉकफोर्सने केलेल्या गोळीबारात नक्षलवादी कमलू ठार झाला.

ही घटना २९ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलीस ठाण्यांतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली. बालाघाट पोलीस ठाण्यांतर्गत हे या वर्षातील तिसरे मोठे यश आहे.

यापूर्वी २२ एप्रिलला प्रत्येकी १४ लाख रुपये बक्षीस असलेल्या एक महिला नक्षलवादी क्षेत्र कमांडर टांडा दलम ची सुनीता आणि टांडा दलममधील एरिया कमांडर आणि सध्या विस्तार दलममध्ये कार्यरत असलेल्या नक्षलवादी कबीरच्या गार्ड असलेल्या खटिया मोचा दलम मधील सरिता यांना ही चकमकीत ठार झाले होते. त्यांच्याकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले होते.

२९ सप्टेंबरला पुन्हा एकदा हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात हॉकर्स जवानांनी शौर्य दाखवून १ नक्षलवादी कमलूला ठार केले. कमलूकडे असलेली रायफल जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस महानिरीक्षक संजय कुमार, बालाघाट जिला पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या घटनेला दुजोरा दिला.

या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या घनदाट परिसरातील जंगलात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे असे सौरभ समीर (एस पी बालाघाट) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

SCROLL FOR NEXT