Ravikant Tupkar, Buldhana
Ravikant Tupkar, Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Elgar Morcha : एल्गार मोर्चा; 'बळीराजाच्या हितासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन एकत्र या'

संजय जाधव

Ravikant Tupkar : पावसाने सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. हे नुकसान अस्वस्थ करणारे आहे. अद्याप पंचनामे नाही, दुसरीकडे शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व सोयाबीन- कापसाला भाव मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारला दिला आहे. (Ravikant Tupkar Latest Marathi News)

शेतक-यांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारला जाग यावी यासाठी येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाणा (buldhana) येथे भव्य एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर रविकांत तुपकर हे विविझ तालुक्यात जाऊन बैठका घेताहेत. या बैठकांमधून शेतकरी वर्गाला सरकारकडून मदत मिळावी यासाठी माेर्चास येण्याचे आवाहन केले जात आहे.

रविकांत तुपकर म्हणाले पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी, दुधावाले शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करून भाव मिळवून घेतात परंतु सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी संख्येने मोठे असुनही एकत्र येत नाही, ही शोकांतिका आहे. मात्र आता आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन शेतकयांना एकत्र करीत आहोत.

पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे अद्याप झाले नाही. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असून कोणतीही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यात आता सोयाबीनचे दर पडले आहेत. सोयाबीनचा एका क्विंटलमागे खर्च ५७८३ आहे मात्र सध्या भाव ४ हजारापर्यत आहे, कापसाला क्विंटलमागे ८१८४ खर्च तर भाव ७ हजारापर्यंत आहे यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरुन निघणार नाही. (Maharashtra News)

सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. विरोधक सोयाबीन - कापसावर बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान प्रतिक्विंटल ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, मार्केट स्थिर राहण्यासाठी सोयापेंड आयात करणार नाही, हे जाहीर करावे. (Breaking Marathi News)

यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, या मागण्या राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मांडून पाठपुरावा करावा, अशा आमच्या मागण्या असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

बळीराजाच्या हितासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून एकत्र यावे, असे आवाहन आम्ही करत असून गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होईल असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT