अट्टल चोराकडून तब्बल अकरा दुचाकी हस्तगत
अट्टल चोराकडून तब्बल अकरा दुचाकी हस्तगत  दिनू गावित
महाराष्ट्र

अट्टल चोराकडून तब्बल अकरा दुचाकी हस्तगत

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार, धुळे आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याकडून सुमारे 5 लाख 87 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, धुळे आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

हे देखील पहा -

धडगाव तालुक्यातुन एका 22 वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन मक्याच्या शेतात लपवलेल्या ११ मोटारसायकल हस्तगत केल्या आहे. नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मासिक गुन्हे बैठकीत याबाबत आढावा घेतला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरी झालेल्या बाबतच्या गुन्ह्याची माहिती काढत तपासाची चक्रे फिरवली.

गुप्त माहितीच्या आधारे धडगाव तालुक्यातील एक इसम कमी किमतीत आणि विना कागदपत्रे असलेली मोटारसायकल विक्री करत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार करून त्याठिकाणी रवाना केले असता पथकाने एका 22 वर्षीय देविदास उर्फ बादशहा कैलास राऊत याला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने विविध ठिकाणांहुन मोटारसायकल चोरी केल्या असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 5 लाख 87 हजाराच्या 11 मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT