Electricity MSEDCL Saam TV
महाराष्ट्र

MSEDCL: महाराष्ट्रातील वीज महागणार? महावितरणची आयोगासोबत खलबत

वीज बिल वाढीच्या मुद्यावरुन महावितरण आणि विद्युत नियामक आयोगामध्ये बैठक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दिवाळी तोंडावर आली असतानाच आता सर्व सामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील वीज (Electricity) आणखी महागणार असून वीज दर वाढवण्याची तयारी सुरू झाली याबाबत महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे. (MSEDCL)

वीज बिल वाढीच्या मुद्यावरुन महावितरण आणि विद्युत नियामक आयोग यांच्यामधील बैठकीनंतर आयोगाने कंपनीला दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याचं समजतं आहे. (Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd)

पाहा व्हिडीओ -

वीज दरवाढ (दरवृद्धी) याचिका पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. आयोगाने 2000 मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता. त्या नियमानुसार अडीच वर्षांपर्यंत महावितरण दरवाढीची मागणी करू शकत नव्हता मात्र ती मुदत 30 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर महावितरणने आता नव्या दरवाढीला मंजुरी मिळविण्यासाठी याचिका दाखल करण्याचा पुढाकार घेतला असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियामक आयोगात जाऊन (Mid Term Petition) दर वृद्धी याचिका दाखल करण्याबाबत चर्चा केली आहे.

त्यानुसार आयोगाने कंपनीला 30 नोव्हेंबरपूर्वी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या वीज दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार की काय अशा चर्चांनी उधाण आलं आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. ती थकबाकी कंपनी वसुल करू शकली नाही. कोविडच्या काळात एकूण थकबाकी 70 हजार कोटी रुपये होती. आत्ता देखील तेवढीच थकबाकी असल्याचं समजतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT