Jayant Patil Viral Video Saamtv
महाराष्ट्र

Jayant Patil Viral Video: काय सांगता! चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात जयंत पाटलांनी ठोकले भाषण; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

NCP Viral Video: राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा, मार्गदर्शन मेळाव्यातील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे....

Rashmi Puranik

Nashik News: सत्ताधारी शिंदे- सरकार विरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वज्रमूठ आवळली आहे. भाजप सरकारला शह देण्यासाठी महाविकास आघाडीप्रणित सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) जाहीर सभांमधून शिंदे गटावर हल्लाबोल करत असतानाच राष्ट्रवादीनेही (NCP) पक्ष बळकटीच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

याच निमित्ताने राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा या दौऱ्याचं आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवारी रात्री या दौऱ्यात घडलेली घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. रात्री 11 वाजता ही बैठक सुरु असताना अचानक वीज गुल्ल झाली. मात्र ना जयंत पाटील बोलायचं थांबले ना कार्यकर्त्यांनी जागा सोडली. मोबाइलच्या टॉर्च सुरु करत जयंत पाटलांनी ही सभा संपवली. (Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, 'राष्ट्रवादी पुन्हा... वारे परिवर्तनाचे... ध्यास प्रगतीचा' या दौऱ्याचा मंगळवारी तिसरा दिवस होता. सकाळच्या सत्रात जळगाव केल्यानंतर नाशिक जिल्हयातील चांदवड विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असून या दौऱ्यात पक्षवाढ आणि बुथ कमिट्या स्थापन करण्याचे आवाहन जयंतराव पाटील करत आहेत.

याच दौऱ्याअंतर्गत मंगळवारी रात्री अकरा वाजता चांदवड विधानसभा मतदारसंघाची बैठक सुरू असतानाच अचानक वीज गायब झाली. मात्र वीज येईल याची वाट न बघताच जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरी सुरू करताच संपूर्ण सभागृहात मोबाईल बॅटरीचा उजेड करुन पक्षाप्रती व जयंतराव पाटील यांच्या पक्ष वाढीच्या मेहनतीला कार्यकर्त्यांनी दाद दिली. जयंत पाटील यांच्या या मेळाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान या दौऱ्यामध्ये संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. या सभांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. कोर्टाच्या निकालात जर १६ शिवसेना आमदार अपात्र ठरले तर हे सरकार बेकायदेशीर ठेरले. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला पायउतार होण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असं वक्त्वय जयंत पाटील यांनी केले आहे. (Maharashtra Polilitics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT