नंदुरबार - तालुक्यातील रजाळे येथील ठेलारी आदिवासी वसाहतीत घरासमोरील विद्युत खांबाची (Electric Pole) दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा विजेचा खांब खालच्या बाजूनी पूर्णपणे गंजून गेल्याने वीज प्रवाह सुरू असताना अचानक पडला. सुदैवाने यावेळी कोणीही जवळपास नसल्याने जीवितहानी टळली आहे.
मात्र वारंवार जीर्ण विद्युत तारा व खांब तुटून पडत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्युत वितरण कंपनीचा आडमुठेपणामुळे गावात असे चित्र दिसून येत आहे. संबंधित विद्युत वितरण विभागाने लक्ष घालावे अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये उमटू लागल्या आहे.
हे देखील पाहा -
गावामध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही दिवसापूर्वी या वस्तीमध्ये विद्युत केबल टाकण्यात आली मात्र पोल जैसे थे असल्याने ही घटना घडली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. महावितरण वीज बिल जर सक्तीने वसुली करीत असेल तर ग्राहकांना सहकार्य करणे हे वीज मंडळाचे नैतिक कर्तव्य आहे.
मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. या ठिकाणी घरे तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात, अशा वेळी अपघातांची समस्या नाकारता येत नाही. तसेच पावसाळा सुरू असून यामुळे विजेच्या शॉक लागण्याची शक्यता असते.
अशावेळी वीज मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या ठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ सावळीराम शिवाजी करिया, धनराज सखाराम भील, देविदास सखाराम भिल, कृष्णा मरिबा ठेलारी, भिवा मरीबा ठेलारी, बायजाबाई शिवा ठेलारी, हंबर शिवा ठेलारी, कंगा भिवा ठेलारी या रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.