Kolhapur Shocking Crime Saam Tv
महाराष्ट्र

'आईवरून शिव्या देतोस..' मित्राने मित्रालाच संपवलं; चाकूने वार करत हत्या, नंतर घर पेटवलं

Shocking Kolhapur Crime: कोल्हापूरच्या हनुमाननगरमध्ये मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला. आईवरून शिवीगाळ केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापूरच्या हनुमाननगरमध्ये मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला.

  • आईवरून शिवीगाळ केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

  • आरोपीनं खून केल्यानंतर खोलीला आग लावली.

  • पोलिसांनी ४ तासांत आरोपीला अटक करून प्रकरणाचा उलगडा केला.

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली. आईवरून शिवी दिल्याकारणामुळे मित्राने मित्राचा खून केला आहे. गळा चिरून हत्या केली असल्याची माहिती आहे. या हत्या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अवघ्या ४ तासांतच खूनाचा उलगडा केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हा धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या हनुमाननगर येथे घडला आहे. चंद्रकांत केदारी शेळके (वय वर्ष ७३) असे आरोपीचे नाव आहे. त्यानं मोहन सूर्यकांत पोवार (वय वर्ष ७०) याची गळा चिरून निर्घृण हत्या केली. मृत व्यक्तीचे आरोपीसोबत काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली होती. मृत व्यक्तीने आरोपीला शिवीगाळ केली होती.

याच रागातून आरोपीनं मृत व्यक्तीला मारहाण केली. नंतर रागाच्या भरात चाकूने गळा चिरला. या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. नंतर मृत व्यक्ती उपस्थित असलेल्या खोलीला आग लावली. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

तपासात चंद्रकांत केदारी शेळके यानं खून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जुना राजवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणाची पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT