Saam tv Impact  Saam tv
महाराष्ट्र

Latur Farmer : बळीराजाची परवड थांबेना; विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला अन्..., वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra assembly session : आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची..कृषीप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्याची भीषण अवस्था साम टीव्हीने समोर आणली आणि त्याची दखल थेट कृषीमंत्र्यांनी घेतलीय.. नेमकं काय घडलं? पाहूयात......

Saam Tv

काळीज पिळवटून टाकणारा आणि कृषी प्रधान महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगणारा हा वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडीओ पाहा.....लातूरच्या हडोळती गावच्या शेतकऱ्यानं बैल घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःचं औताचं जू खांद्यावर घेतलं आणि त्याच्या दुःखाला साम टीव्हीने वाचा फोडली. याच बातमीची दखल घेत विरोधकांनी सरकारलाच घेरलं.

विरोधकांनी अधिवेशनात यावर आवाज उठवला आणि यंत्रणा अरबी घोड्यासारखी धावली.... कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पाठवलंय.. तर कृषी विभागामार्फत त्यांना मदतीचं आश्वासन कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलंय...

दुसरीकडे अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही वृद्ध शेतकऱ्यांना फोन करुन त्यांच्यावर असलेल्या 40 हजारांचं कर्जमाफ करण्याचं आश्वासन दिलंय. तर साम टीव्हीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या आणि झोपी गेलेल्या सरकारला जागं केल्याबद्दल लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याने साम टीव्हीचे आभार मानलेत...

राज्यातील 20 लाख 37 हजार शेतकऱ्यांवर 31 हजार 254 कोटींचं कर्ज आहे.. तर सततची नापीकी, आसमानी संकट, शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललाय.. मात्र आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं खाली करुन पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Winning Candidate List: गोकुळचे नवे कारभारी कोण? वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार; बेकायदा अटक खपवून घेणार नाही- हायकोर्टानं सुनावलं

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; भातशेतीचे नुकसान होण्याची भीती

Ashutosh ranka and Saurav das : सौरव दास, आशुतोष रांकाची कोठडी वाढणार? कोर्टानं आदेश ठेवला राखून

Manmad Vande Bharat : मनमाडकरांसाठी खुशखबर! आणखी एक वंदे भारत थांबणार, तिकिट किती?

SCROLL FOR NEXT