El Nino Threatens Rabi Crops; Centre Warns Of Challenges For Farmers saam tv
महाराष्ट्र

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

El Niño Impact on Rabi Crops: खरिपानंतर आता रब्बी हंगामावरही मोठं संकट निर्माण झालंय. नेमकं कोणत मोठं संकट यामुळे निर्माण झालंय? एल निनोच्या सावटामुळे देशावर काय परिणाम होणार? केंद्र सरकारनं काय इशारा दिलाय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

  • खरीप हंगामानंतर आता रब्बी पिकांसमोरही हवामानाशी संबंधित आव्हान

  • कोरडवाहू भागातील शेतीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  • रब्बी हंगामाच्या तयारीसाठी राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यात आली आहे.

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. खरीप हंगामात काहीच हाताशी आलेलं नसताना रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा रब्बी हंगामातील पिकांवर संकट येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः कोरडवाहू भागांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिलाय. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत नेमकी काय चर्चा झाली,ते पाहूयात.

काही राज्यांमध्ये जमिनीत अतिरिक्त ओलावा राहण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये पिकांना दीर्घकाळ पाण्याच्या ताणाला सामोरे जावे लागू शकते. देशात अन्नधान्य स्वयंपूर्णतेसाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हवामान बदल हे आता दूरचे संकट राहिलेले नसून एक वस्तुस्थिती बनल्याचं केंद्रीय कृषी सचिव अतिश चंद्र यांनी नमूद केलंय.

रब्बी हंगामासाठी सरकारनं आतापासूनच नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. तर दुसरीकडे, एल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाकडूनही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येतंय. दरम्यान, राज्यात किती क्षेत्र रब्बी पीक पेरणी खाली आहे ते पाहुयात.

रब्बी पीक पेरणी क्षेत्र

गहू - 300 लाख हेक्टर

कडधान्य - 140 लाख हेक्टर

तेलबिया- 87 लाख हेक्टर

भरडधान्य 55 लाख हेक्टर

एकूण रब्बी क्षेत्र सुमारे 638 लाख हेक्टर

आधीच पावसानं दडी मारल्यानं राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. येत्या ऑक्टोबरपासून रब्बी पिकांची पेरणी सुरू होत असतानाच आता एल निनोचं संकट समोर उभं ठाकलंय. अशा परिस्थितीत आगामी रब्बी हंगामावर मोठा परिणाम झाला शेतकऱी तर अडचणीत येणारच..मात्र थेट देशात अन्नधान्याचा तुटवडाही निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आतापासूनच सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT