Eknath Shinde helicopter develops technical fault saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; शिवसेना नेत्याला वेगळाच संशय, थेट चौकशीची मागणी

Helicopter Technical Glitch : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड आढळला. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आता शुभांगी पाटील यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज, धुळे

Eknath Shinde Helicopter News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौरा आटोपून पुण्याकडे येत असताना मोठा अनर्थ टळला. ते हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या वेळीच लक्षात आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पंढरपूरमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आणि अखेर एकनाथ शिंदेंनी थेट रस्तेमार्गे ठाण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या घटनेनंतर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. "एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड होत असेल, तर हा केवळ योगायोग असू शकत नाही; याची सखोल चौकशी व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमके काय म्हणाल्या शुभांगी पाटील?

या घटनेवर बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, "आत्ताच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेबांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मात्र, दोन-तीन वेळा विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये असा बिघाड होत असेल, तर त्याचा तपास झालाच पाहिजे. इतक्या वेळा हेलिकॉप्टरचा बिघाड होणे हा योगायोग नसू शकतो, त्यामुळे याची चौकशी होणे आवश्यक आहे."

'लाडक्या बहिणींचे आशीर्वाद पाठीशी'

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करताना म्हटले की, "एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्या पाठीमागे गोरगरीब जनता, कष्टकरी शेतकरी, मायमाऊली आणि लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू शकत नाही आणि त्यांचे कधीच काही वाईट होणार नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच सर्व लाडक्या बहिणींची सदिच्छा आणि आशीर्वाद आहेत."

पंढरपूरमध्ये नेमकं काय झालं?

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आधी मोटार सायकलवर स्वार होऊन, तर चंद्रभागेच्या पात्रात बोटीत बसून फेरफटका मारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केला. पाहणी दौरा संपल्यानंतर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होण्यासाठी निघाले होते. सायंकाळी ४ ते साडेचार वाजताच्या आसपास एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी गेले. पण त्याआधीच पायलटला बॅटरीमध्ये बिघाड असल्याचं समजले. हेलिकॉप्टर अथवा विमान उड्डाण घेण्याआधी पायलटकडून तपासणी केली जाते, त्याच तपासणीवेळी हेलिकॉप्टरमधील बिघाड लक्षात आला. त्यानंतर तेथील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंनी त्यानंतर रस्तेमार्गे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White cloths Innerwear: महिलांनी पांढरे कपडे घालताना चुकूनही घालू नका पांढरे अंतर्वस्त्र! त्याऐवजी ट्राय करा 'हे' खास रंग

LPG गॅस टँकर आणि बसची जोरदार धडक, १० जणांचा होरपळून मृत्यू, २७ जण गंभीर जखमी

भीषण अपघात; चहा प्यायला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला, 5 जणांचा करूण अंत

ढग पांढरे आणि काळ्या रंगाचेच का असतात?

Maharashtra News Live Update: दिव्यांगासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT