Eknath shinde news  Saam tv
महाराष्ट्र

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Eknath shinde news : खोक्यानंतर आता राज्याच्या राजकारणात बॅगांची चर्चा सुरु झालीय... मालवण दौऱ्यात एकनाथ शिंदेंचे काही सुरक्षा रक्षक बॅगा घेऊन जाताना दिसले... आणि विरोधकांनी शिंदेंवर मालवण दौऱ्यातही पैसे वाटप केल्याचा आरोप केला... नेमकं प्रकरण काय? शिंदेंच्या त्या बॅगेत नेमकं काय दडलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Suprim Maskar

मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत खासदार निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटपाच्या आरोपांचा धडकाच लावला..तो अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत..साहजिकच ही निवडणुक पैश्यांमुळे गाजली. ठाकरेसेनाही मालवणमधील पैसे वाटपावरून आक्रमक झाली.खासदार संजय राऊतांनी पोस्ट करत.. 'मालवणमध्ये शिंदेंनी बँगेतून काय आणलं?' असा सवाल उपस्थित करत 'लोकशाहीची ऐशी की तैशी' असं म्हटलंय. तर दुसरीकडे ठाकरेसेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनीही शिंदेंनी मतदारांना वाटण्यासाठीच पैसे आणले, असा आरोप केलाय...

दरम्यान वैभव नाईकांच्या या आरोपावर शिंदेसेनेही पलटवार केलाय...प्रचारासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या हातात बॅगा दिसतात, असा टोला उदय सामंतांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीतही राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हेलिकॉप्टरमधून नाशिकला पैसे नेल्याचा आरोप केला होता. तेव्हाही बॅग तपासण्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. आता पुन्हा एकदा शिंदेंची बॅग चर्चेत आली आहे. कोकणातील निवडणूक विकास कामांऐवजी रुपय्याच वरचढ ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT