Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 3? उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार?

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा ‘वेट अँड वॉच 3.0’ मजकूर असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा ऑपरेशन टायगर 3.0 राबवले जाणार का, याबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

Surabhi Jayashree Jagdish

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलीये. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात होता. तर आता पुन्हा एकदा एका फोटोमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोवर 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3.0' राबवलं जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. दुसरीकडे महायुतीला मात्र मोठा फटका बसला होता. महायुतीमधील अनेक मोठ्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते.

दरम्यान निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढली आहे. आता राज्यातील महायुतीमध्ये सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत.

पण आता एकनाथ शिंदे यांचा 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर असलेला फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. या फोटोमुळे शिंदे पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' राबवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पंतप्रधान माझा फोन टॅप करतात'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Saturday Horoscope : आजचा दिवस आनंदात जाईल! या ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार

Drought in Maharashtra: महाराष्ट्रात केंद्रीय मदतीचा 'दुष्काळ'; राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून वाटाण्याच्या अक्षता

अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? मफलरवाल्या पोस्टरने राजकारण तापलं!

Assam Kaziranga Accident: डोळ्यांच्या पापण्या लवते न लवते तोच अनर्थ घडला! भरधाव ट्रॅव्हलर थेट कंटेनर ट्रकवर आदळला; २४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT