Maharashtra Political Crisis Eknath Shinde Uddhav Thackeray Latest Update SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis Live : भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीनंतर गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची बैठक सुरू

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जाणून घेऊयात क्षणोक्षणीच्या ताज्या अपडेट्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीनंतर गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची बैठक सुरू

भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीनंतर गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे . गुरुवारी बहुमत सिद्ध चाचणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुवाहाटी तील आमदारांना गुरुवारी अलर्ट राहण्याच्या दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी पहाटे विशेष विमानाने केंद्रीय पोलीस दलाच्या सुरक्षेत बंडखोर आमदारांना मुंबईत हलवले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फणडवीस राज्यपालांच्या भेटीला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय भाजपकडून आता सत्तास्थापने बाबतच्या हालचालींना वेग आला असल्याचंही बोललं जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसेना आमदारांना आवाहन

उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना पुन्हा आवाहन केलं आहे. समोर येऊन बोललात तर, मार्ग निघेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

जालना: दोन दिवसांत तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करून टाकू: चंद्रकांत खैरे

संजय राऊतांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पुन्ही ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवली असून, राऊत यांना आता १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.

ठाण्यातील आनंद आश्रमावर आता एकनाथ शिंदे गटाचा ताबा - सुत्र

ठाण्यातील आनंद आश्रमावर आता एकनाथ शिंदे गटाने ताबा घेतला असून हेमंत पवारांकडून आनंद आश्रमाच्या चाव्या शिंदे गटाने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील नरेश म्हस्केंनी आनंद आश्रमाच्या चाव्या स्वतःच्या ताब्यात घेतल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वखुशीनं गुवाहाटीला आलोय, उदय सामंत यांनी पोस्ट केला व्हिडिओ

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही; गैरसमजाला बळी पडू नका

शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आजही आपण शिवसेनेसोबतच असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.

सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.

याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती.

नाशिक: सटाण्यात शिवसैनिक आक्रमक, बंडखोर आमदारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

- बंडखोर आमदारांविरोधात सटाण्यात शिवसैनिक आक्रमक

- बंडखोर आमदारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

- पुतळा जाळून शिवसैनिकांनी केला निषेध

- सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावर शिवसैनिकांचा रास्तारोको

- बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना, फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे वृत्त शिवसेनेकडून फेटाळले 

येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजप चे सरकार येईल - प्रताप पाटील चिखलीकर

  • येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजप चे सरकार येईल.

  • देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा हे फडणवीस करतील.

  • तसेच शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे सोबत येतील.

  • एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट मुख्य सचिवांना लिहलं पत्र

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सरकारकडून 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. 22 ते 24 जून दरम्यानच्या जीआरची माहिती राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवली आहे. त्यामुळे आता मुख्य सचिव राज्यपालांना या जीआरबाबत नेमकी काय माहिती देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिवसेनाला मोठा झटका; करमाळ्याचे माजी आमदार शिंदे गटात

करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाला मोठा झटका बसला आहे.

ईडीकडून चौकशीसाठी समन्स; संजय राऊत आज अनुपस्थित राहण्याची शक्यता

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, आज संजय राऊत चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT