Eknath Shinde meeting with PM Modi in Delhi amid BMC seat distribution controversy Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Mahayuti Political Maneuvers: एकनाथ शिंदे महायुतीत जागा वाटपावर नाराज असल्याची चर्चा असताना शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली आहे.

Omkar Sonawane

ऐन दिवाळीत महायुतीत पुन्हा कुरघोडीच्या फटाक्यांचे बार उडायला सुरुवात झालीय.. केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं थेट 150 पारचा नारा दिलाय... तर शिंदेसेनेला केवळ 64 ते 75 जागा देण्याचा डाव भाजपनं आखलाय... त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची चर्चा रंगलीय.. मात्र ही भेट राज्याच्या विकासासंदर्भातील असल्याचा दावा शिंदेंनी केलाय...

दुसरीकडे महायुतीतील जागा वाटपाच्या दाव्यावरुन संजय राऊतांनी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांना खोचक टोला लगावलाय.. तर बावनकुळेंनी मात्र महायुतीत शिंदे नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय..

खरंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदेसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे.. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात रान पेटवलंय... तर दुसरीकडे भाजपनेही ठाणे, नवी मुंबईसह कोकणात शिंदेसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर का होईना... शिंदेंची नाराजी दूर होणार की पालिका निवडणुकीच्या तोंडावर कुरघोडीचं राजकारण आणखी तापणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT