नंदुरबारमध्ये मिरवणुकीतील वादातून हिंसाचार
माजी आमदारांच्या घरावर दगडफेक व जाळपोळीचा प्रयत्न
एकूण पाच गुन्हे दाखल; पाच आरोपी अटकेत
शहरात तणावपूर्ण वातावरण; पोलिसांचा कडक बंदोबस्त
एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना दुसरीकडे नंदुरबार शहरात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांकडून स्वतंत्रपणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक करत गाड्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये जवळपास ५० जणांविरोधात दरोडा आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेतील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती असून, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जाणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर आणि कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.