Maharashtra Minister Sanjay Shirsat faces backlash after making a protester drink juice at his home in Chhatrapati Sambhajinagar. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

छत्रपती संभाजीनगरात उपोषणकर्त्याला घरी बोलावून ज्यूस पाजत उपोषण संपवण्याची घटना! एकनाथ शिंदेंच्या आमदार संजय शिरसाट यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar, डॉ. माधव सावरगावे

Sajay Shirsat News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उपोषणकर्त्याला घरी बोलावून ज्यूस पाजत असंवेदनशीलतता दाखवली. कर्जमाफीसाठी कन्नडमध्ये संदीप सेठी यांनी उपोषण केले होते. पालकमंत्री शिरसाट यांनी सेठीला घरी बोलवलं अन् उपोषण सोडायलं लावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उडाली.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुरू केलेले उपोषण थेट पालकमंत्र्यांच्या घरी छत्रपती संभाजी नगर शहरात सोडल्याची अजब घटना घडलीय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर नवव्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना घडली.

कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसुली वर्षभरासाठी स्थगित करावी आदी मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली; परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंतमाघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली. या कालवधीत सेठी यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करण्यात आले.

शेवटी शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी आहे. त्यानंतरही दिवाळीच्या सुट्टया आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर असतील, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनतर तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या सहायकांशी संपर्क साधला.यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्युल आहे. त्यामुळे त्यांना कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा निरोप देण्यात आला. त्यानंतर भूषण कर्त्याला थेट छत्रपती संभाजी नगर शहरातील पालकमंत्री यांच्या घरी आणून उपोषण सोडले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

Maharashtra Live News Update : सुमारे 11 हजार दिव्यांची रोषणाई करत प्रकाशा येथे संगमेश्वर महाआरती...हजारो भाविकांची उपस्थिती.

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

Swabhimani Shetkari Sanghatna : दिवाळी सणात चटणी भाकर आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT