सध्या अक्षय खन्ना, रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घालतोय. त्यातही अक्षय खन्नाने साकारलेले रहमान डकैतचं पात्र फारच चर्चेत आहे. हिवाळी अधिवेशनातही धुंरधरची जोरदार चर्चा रंगली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही विरोधकांवर निशाणा साधताना धुरंधर सिनेमाचा मोह आवरता आला नाही. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत कोण? याचा शोध घ्या असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर महायुतीला त्यांनी धुरंधरची उपमा दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात रहमान आणि धुरंधर कुठे धूर गेला माहित नाही. दुसरीकडे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही मुंबईच्या डकैतचा पत्ता वांद्रे पूर्वच्या दिशेने असल्याचं म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेवर तीन दशके शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची सत्ता होती. आता राजकीय समिकरणे बदलली आहेत. किमान आर्थिक राजधानी तरी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंनी वज्रमूठ आवळली आहे. आरोप-प्रत्यारोपांमध्ये सत्ताधारी नेते विरोधकांना खलनायक ठरवत आहेत. मात्र मतदारांच्या मनात कोण खरा धुरंधर आहे ते निकालानंतरच कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.