Eknath Shinde’s political strength rises significantly after six MPs defect, reshaping Maharashtra’s power dynamics. saam tv
महाराष्ट्र

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

Eknath Shinde Power Rise After Rebel Mp Maharashtra: ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटल्यामुळे एकनाथ शिंदेंची राज्यातील राजकीय ताकद वाढली आहे. शिंदे सेनेचे सर्वाधिक खासदार झाले आहेत. त्यामुळे साहजिकच शिंदेंची 'बार्गेनिंग पॉवर' वाढली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...

Girish Nikam

शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे राज्यातील भाजपच्या गोटात काहीशी चलबिचल असल्याचं समजतंय. शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यामुळे एनडीएचं लोकसभेतील संख्याबळ वाढणार असून शिंदेसेनेच्या खासदारांची संख्या सातवरून 13 होणार आहे. यामुळे शिंदेसनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींच्या आशीर्वादानंच शिंदेंनी ठाकरेंचे खासदार गळाला लावल्याची चर्चा आहे. राज्यात आता शिंदेंची ताकद कशी वाढणार ते पाहूयात...

राज्यात शिंदेसेनेची पॉवर वाढणार?

(खासदारांची संख्या)

शिंदेसेना

7 + 6 = 13

काँग्रेस

13

भाजप

9

राष्ट्रवादी (SP)

8

ठाकरेसेना

9 - 6 = 3

राष्ट्रवादी (AP)

1

अपक्ष

1

ऑपरेशन टायगरमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. भविष्यात ते मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा शिंदेसेनेच्या आमदाराने केलाय. एकीकडे शिंदेसेनेच्या आमदारांनी शिंदे सीएम होतील अशी आशा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात चलबिचल असल्याची सुत्रांची माहिती आहे. राज्यात सर्वाधिक खासदार झाल्यामुळे शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' साहजिकच वाढणार आहे. शिंदेंची राजकीय ताकद वाढल्याच्या पार्श्वभूमिवर भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आनंदच आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयक नव्याने मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारला अधिकाधिक खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळेच दिल्लीतील भाजप श्रेष्ठींच्या आशीर्वादानेच शिंदे यांनी ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार गळाला लावले. शिंदे या फुटीर खासदारांचे बळ भाजपच्या मागे उभे करणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात त्यांना या कामगिरीचं बक्षिस मिळण्याची चर्चा जोरात सुरू आहे. तळागाळातील लोकप्रियता आणि राजकीय ताकद वाढल्यामुळे भविष्यात शिंदे राज्यातल्या भाजपला ओव्हर टेक करुन पुढे जाणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, शेतकरी हैराण

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT