EKANATH SHINDE PISTOL REMARK saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे म्हणाले आण रे पिस्तूल, मी माझ्या डोक्यात गोळ्या घालतो; आमदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Nitin Deshmukh Reveals Shocking Details Of Surat Hotel: २०२२ मधील शिवसेना बंडाबाबत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. सुरत हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी 'पिस्तूल आण' असं म्हटल्याचा दावा त्यांनी केला.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जून २०२२ मध्ये घडलेल्या घटनांबाबत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. २१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला जाऊ असं सांगून आपल्याला गाडीत बसवलं. मात्र, ठाण्याला न जाता गाडी सुरतकडे रवाना झाली, असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. नितीन देशमुख म्हणाले, सुरतकडे जाताना एका टपरीवर गाडी थांबवण्यात आली होती. त्यानंतर एकामागून एक मंत्री तिथे येऊ लागले. सर्वप्रथम शंभूराज देसाई आणि त्यानंतर भुमरे तिथे आले. त्यावेळी आपल्याला संशय आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कैलास पाटील बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने गाडीतून बाहेर पडले आणि तिथून निसटले, असंही नितीन देशमुख यांनी सांगितलं. त्यानंतर गाडी पुढे सुरतकडे रवाना झाली. सुरतमध्ये पोहोचल्यानंतर संबंधित हॉटेलला सुमारे ५०० पोलिसांचा घेरा असल्याचा दावा त्यांनी केला.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपण तिथे थांबणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगितलं होतं. जे काही बोलायचं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू, अशी भूमिका आपण घेतली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपलं ऐकलं नाही, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उद्देशून, 'तू माझा खराबा करतोस, आण रे पिस्तूल, मी माझ्या डोक्यात गोळ्या घालतो,' असं म्हटल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला. त्यावर 'असं करू नका, माझ्या डोक्यात गोळी घाला,' असं आपण उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, सुरतमध्ये असताना आपल्याला औषध आणि इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आपण ते नाकारल्याचा दावाही नितीन देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडी MMR मधील सर्वाधिक प्रदूषित शहर

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टला बॉम्बनं उडवून टाकू; पंजाबी पॉपस्टार खलिस्तानीच्या निशाण्यावर

Political News : हिवाळी अधिवेशनाआधी महेश बालदींची आमदारकी धोक्यात? कारवाईची कोणी केली मागणी, काय आहे कायदा?

WhatsApp Web Security : WhatsApp वापरताय? सावधान! एका चुकीमुळे तुमचे खासगी मेसेज होऊ शकतात लीक

फक्त पुण्यातच! फाटके कपडे परत देणाऱ्या पतीला पत्नीचा दणका; सोन्याच्या व्यवहारासाठी थेट सराफालाच आणले कोर्टात

SCROLL FOR NEXT