Shiv Sena Crisis  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर, उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना पक्ष मिळाल्यानंतर उद्या पहिल्यांदा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरज सावंत

Eknath Shinde: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिक सक्रिय झाला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्ष मिळाल्यानंतर उद्या पहिल्यांदा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यकारणीच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून ते सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी, खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Latest Political News)

दरम्यान पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानतंर शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देऊ शकते. शिंदे गटाकडून आता ठाकरे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. एकीकडे राज्यभरातील शिवसेनेचे कार्यलये ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे (Eknath Shinde) गटाने सुरु केलेले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो.

उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेमध्ये असलेले विरोधी पक्षनेतेपद घालवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली केल्या जाऊ शकतात. विद्यमान शिवसेनेच्या आमदारांपैकी किंवा नवनियुक्त अपक्ष आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेत्याची नियुक्ती करून व्हिप जारी केला जाऊ शकतो.

या व्हिपची अंमलबजावणी शिवसेनेतील सर्वच सदस्यांना बंधनकारक राहील. तसेच या व्हिपचे उलंघन झाल्यास संबंधित आमदारावर कारवाईचीही मागणी केली जाऊ शकते. यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते.

विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या नवनियुक्त गटनेत्याचा आदेश उद्धव ठाकरे यांना देखील मान्य करावा लागेल. त्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंचे विरोधीपक्ष नेते पदही धोक्यात येऊ शकते. परंतु उद्धव ठाकरे यांनी आम्ही वेगळा पक्ष असून निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला नाव आणि चिन्ह देखील दिले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आम्हाला लागू होऊच शकत नाही असा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT