CM Eknath Shinde Group Mla Pratap Sarnaik Fraud Saam TV
महाराष्ट्र

MLA Pratap Sarnaik News: शिंदे गटाच्या आमदाराची कोट्यवधीची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

MLA Pratap Sarnaik Fraud: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

MLA Pratap Sarnaik Fraud: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जमीन व्यवहारात आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत (Police) दाखल झाली आहे.

सरनाईक यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या तक्रारीनुसार काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रताप सरनाईक यांना घोडबंदर येथे जमीन खरेदी करायची होती.

यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मार्टीन बर्नार्डो या कोरियन व्यक्तीला संपर्क केला होता. प्रताप सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले. मात्र, त्या व्यक्तीन जमीन नावावर केली नाही.

यानंतर त्याने घेतलेले पैसे देखील परत केले नाही. दरम्यान, २०२१ पासून या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. संबंधीत आरोपीने टाळाटाळ केली. यानंतर सरनाईक यांनी अखेर त्यांच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार दिली.

आता या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर फसवणूक संबंधीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

SCROLL FOR NEXT