Mumbai Pune Expressway: सावधान! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताय? आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक, कारण काय?

Mumbai Pune Expressway Closed News (28 July): मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत हा ब्लॉक घेतला जाणार असून महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे.
Two hour block traffic update on Mumbai Pune Expressway again today
Two hour block traffic update on Mumbai Pune Expressway again todaySaam TV
Published On

Mumbai Pune Expressway Latest Update:

तुम्ही जर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

दुपारी २ ते ४ यावेळेत हा ब्लॉक घेतला जाणार असून महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

Two hour block traffic update on Mumbai Pune Expressway again today
Maharashtra Live Updates (29 Jul): पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकल वाहतूक उशिराने

त्यामुळे वाहनचालकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. एकीकडे महामार्गावरील खंडाळा घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असताना गुरूवारी रात्री कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळली.

यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली. दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व देवदूत आपत्कालीन पथक आणि खंडाळा व वडगाव महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

आयआरबी व देवदूत आपत्कालीन पथकांच्या अथक प्रयत्नानंतर गुरूवारी रात्रीच्या सुमारास काही प्रमाणात दरड हटवली. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, अजूनही कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ काही प्रमाणात कोसळलेल्या दरडीचा भाग रस्त्यावरच आहे.

Two hour block traffic update on Mumbai Pune Expressway again today
India Rain Update: देशात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच, २२ राज्यांना रेड अलर्ट; हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता आज दुपारसच्या सुमारास एक्सप्रेस वेवर पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान, मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळे पासून वळवली जाणार आहे.

मुंबईकडे येणारी वाहने जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मार्गस्थ होईल आणि लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील. याआधी सोमवारी आणि गुरुवारी असेच विशेष ब्लॉक घेण्यात आले होते. त्यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटविण्यात आली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com