Nanded News
Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये राडा घालणाऱ्या ५० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

संतोष जोशी

नांदेड: शिवसेनेतील (ShivSena) ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात शिवसैनिकांनी निदर्शने सुरू केली आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात येत आहे. नांदेडमध्ये दोन दिवसापासून शिवसेनिकांनी आंदोलने केली आहेत, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी ५० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये शिवसेनेतील बंडाचे मोठे पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी आजी, माजी अध्यक्षांसह माजी आमदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये आंदोलना दरम्यान, राडा घालणाऱ्या शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार, जिल्हा प्रमुखासह अनेक शिवसैनिकांत विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात तीन दिवसांपासून आंदोलन केले जात आहेत.

शिंदे गटाला SC चा तात्पुरता दिलासा

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाला शिंदे गटाला फटकारलं आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, अशी विचारणा केली. तसंच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही केला आहे. (Eknath Shinde Latest News)

सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्ष यांना नोटीस बजावली असून यामध्ये सहाही पक्षांना नोटीस दिली आहे. केंद्र सरकारला सुद्धा नोटीस दिली आहे. बंडखोर 16 आमदारांना सुद्धा नोटीस दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाने दिली.

दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने बंडखोर आमदारांना दिलासा दिला आहे. 12 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी सांगितलं. शिंदे गटाच्या वकिलांनी हे विधान रेकॉर्डवर घ्यावं अशी विनंती केली. सिंघवी यांनी यावर सांगितलं की, सामान्यत: कोर्ट अध्यक्षांच्या वतीने केलेले विधान रेकॉर्ड करणार नाहीत. कारण ते त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासारखं आहे. (Shivsena Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Health News: 'मला आणि राखी सावंतला जीवे मारण्याच्या धमक्या...'; एक्स पतीने केला मोठा खुलासा

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर; SIT तपास सुरू

Dog Attack on Child : भटक्या कुत्र्यांचा ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; घराबाहेर पडताच लचके तोडले; नागपुरातील भयानक घटना

Assam News: एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जरा जपून ठेवा, 'या' भागातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT