Eknath Shinde helicopter develops technical fault saam tv
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूरात धावपळ |VIDEO

Eknath Shinde Helicopter Technical Glitch: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर परतीच्या प्रवासापूर्वी हा प्रकार घडला.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी रवाना होणार होते. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी प्रशासनाची काहीवेळ तारांबळ देखील उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मतदार यादी पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

विरोधी पक्षाच्या महिला खासदाराच्या ताफ्याला घेरलं, कारवर अंडी फेकली; भाजपवर आरोप VIDEO व्हायरल

Political News: जागा वाटपावरून आघाडीत तिढा; अखिलेश यादवांनी काँग्रेसला फॉर्म्युला सांगितला, 'इतक्याच' जागा मिळणार?

महिलांसाठी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, ऑर्गेन्झा, चिकनकारी आणि टिश्यू साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स

काँग्रेसचे आमदार म्हणाले भावी पिढीला टिपू सुलतान कळाले पाहिजे, नितेश राणे म्हणाले उदात्तीकरण केल्यास मातीत गाडणार

SCROLL FOR NEXT