Raigad Lok Sabha Election 2024 Saam TV
महाराष्ट्र

Raigad Politics: रायगड लोकसभेवरुन महायुतीत वादाच्या ठिणग्या; शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

Raigad Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटकपक्षात वादाच्या ठिणग्या उडत आहेत.

Satish Daud

Raigad Lok Sabha Election Controversy

रायगड लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटकपक्षात वादाच्या ठिणग्या उडत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर टीकेचा भडीमार करीत आहेत. सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडून आल्यानंतर सुनील तटकरे सहकारी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात. तसेच ते मित्रपक्षांना संपविण्यासाठी राजकीय कारनामे करतात, असा आरोप शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केला आहे. रायगडच्या पेणमध्ये शनिवारी (ता. २३) शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली. (Breaking Marathi News)

या बैठकीत रायगड लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार तसेच विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

'...तर तुमचा राजकीय कडेलोट करू'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलो आहोत. महायुतीचे सहकारी म्हणून आम्ही तुमचे काम प्रामाणिकपणाने करू, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हीही आम्हाला सहकार्य करा, असा सल्ला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे

कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन जर तुमच्यात बदल घडला नाही, तर तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा सूचक इशाराही त्यांनी दिला. बैठकीला आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT