uddhav Thackeray and eknath shinde group saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी : एकनाथ शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? कारण...

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय वर्तुळात 'कही खुशी तर कही गम' अशी स्थिती आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे १८ आमदार काल मंगळवारी शपथबद्ध झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला. परंतु, राजकीय वर्तुळात कही खुशी तर कही गम' अशी स्थिती अजूनही कायम आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. आमदारांची नाराजी दूर करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आमदारांना दिलेली आश्वासने न पाळल्याने आमदार नाराज असल्याचेही समजते आहे.

एकनाथ शिंदे गटावर किशोरी पेडणेकरांनी डागली तोफ

शिवेसेना नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी व्यक्त केलीय. शिवसेना आमचीच,धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असं हे आमदार म्हणतात. पण शपथ घेताना किमान आपण बारा तासांचा कालावधी उलटून गेला तरी, एकाही आमदाराला वाटलं नाही की (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायचं, असा घणाघात पेडणेकर यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानते. बहुभाषिक मुंबईत आहेत. मराठी मुंबईत आहेत.मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतून जे गेलेत त्यांच्यातील एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे. जे मंत्री महोदय झाले त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला आहे. ते आमच्याकडे आले, त्यांचा आम्ही बहुमान केला, असं म्हणत पेडणेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT