Shambhuraj Desai On Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांच्या 'त्या' विधानामुळे महाराष्ट्रात उद्रेक होईल; शिंदे गटातील नेत्याचा इशारा

शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Shambhuraj Desai On Ajit Pawar : अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेलं विधान चुकीचं आहे. या विधानाची निंदा करावी तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रात या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल, आणि अजितदादांच्या लक्षात की आपण बोललेलो चुकीचं आहे, असं म्हणत शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले शंभुराजे देसाई?

शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा त्यांची चांगलाच समाचार घेतला. शंभुराजे देसाई म्हणाले, 'अजितदादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याच्या आधी हे बोलले असते, तर साहेबांनी त्यांना आधीच उत्तर दिलं असतं.

छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्य रक्षक म्हणा धर्मवीर म्हणू नका हे अजित दादांच बोलणं चुकीचं आहे. त्यांना धर्मवीर हे नाव आज नाही तर इतिहासानं दिलेलं आहे. संभाजीराजेंनी हिंदु धर्म रक्षणासाठी देहाचं बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणायला पाहिजे, असं शंभुराजे देसाईंनी म्हटलं आहे.

'एकीकडे महापुरूषांचा आदर करा असं सांगायचं आणि दुसरीकडे संभाजीराजेंना धर्मवीर म्हणू नका असं म्हणायचं, हे चुकीचं आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञात स्वत: मात्र कोरडे पाषाण अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांचं आहे. त्याची निंदा करावी तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि दादांना लक्षात येईल आपण बोललो हे चुकीचे आहे', अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली.

अजित पवार काय म्हणाले होते?

'आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही', असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculator: २० वर्षांसाठी १०,००० रुपयांची SIP करा, अन् महिन्याला ६५,००० मिळवा; सोप्या शब्दात कॅल्क्युलेशन समजून घ्या

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT