Lok Sabha Election Result Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election Result : निकालानंतर महायुतीत वादाचे फटाके; अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून पराभवाचं खापर भाजपवर?

maharashtra political News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये नाराजी पसरली आहे. महायुतीमध्ये वादाचे फटाके पाहायला मिळत आहे. नाराजीनंतर महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. या निडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे बहुतांश उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागलं. तर राज्यात भाजपलाही ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मराठवाडा आणि विदर्भात महायुतीला चांगली कामगिरी करता आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धूसफूस समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी विजयी झालेल्या खासदारांनाही यंदा पराभवाचा सामना करावा लागला. या लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर करतान उशीर केला. तसेच उमेदवार बदलायला लावले, त्याचा फटका बसला, अशी शिंदे गटात दबक्या आवाजात चर्चा आहे.

भाजपने दक्षिण मुंबई, शिर्डी, रामटेक, हिंगोली , यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलायला लावले. यामुळे एकनाथ शिंदे यांचे जवळपास १५ दिवस वाया गेले. ऐनवेळी प्रचार करत आला नाही. अशी नाराजीची कुजबुज शिंदे गटात सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पराभवानंतर हेमंत गोडसे काय म्हणाले?

नाशिकमध्ये पराभव झाल्यानंतर शिंदे गटाचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली. 'नाशिकमध्ये उशीरा उमेदवारी जाहीर झाल्याने परिणाम झाला. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र, उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला. शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नाराजी होती. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली. उमेदवारी लवकर जाहीर झाली असती, निकाल वेगळा लागला असता, असा दावा गोडसे यांनी केला.

बारामती निकालावरून अजित पवार गट नाराज?

बारामती निकालावरून अजित पवार गटात नाराजी पसरल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिंदे गटाने मदन न केल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे. सूनेत्रा पवारांना मिळालेली मते ही अजित पवारांचीच आहे. यामुळे अजित पवार गटाच्या काही आमदारांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

SCROLL FOR NEXT