maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी एकाच दगडात मारले 2 पक्षी; ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसचे 8 माजी नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांनी जालन्यात ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर काँग्रेसचे ८ माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

Vishal Gangurde

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मोर्चेबांधणी सुरु असताना एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटासह विरोधी पक्षांना खिंडार पाडणे सुरु आहे. जालन्यातही ठाकरे गटाचा बडा नेता शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. तर काँग्रेसच्या ८ माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन्ही पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. जालन्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तसेच जालन्यातील ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह बोराडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आसाराम बोराडे हे विधानसभा निवडणुकीमध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते. आसाराम बोराडे हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देखील होते. या विधानसभा निवडणुकीत काही मतांनी आसाराम बोराडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आज शनिवारी बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आज शिवसेनेच्या जालना येथील जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आसाराम बोराडे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच जालन्यात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह काँग्रेसलाही मोठा दणका दिला आहे. जालन्यात काँग्रेसला खिंडार पडलं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आठ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जालना शहर महानगरपालिकेचे काँग्रेसचे आठ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला खिंडार पडलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT