Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

...तर सरकारमधून बाहेर पडेन, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा कडक इशारा, नेमकं प्रकरण काय?

MLA Aamshya Padvi : शिंदे सेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आदिवासी आरक्षणावरून सरकारला कडक इशारा दिला आहे. “बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमध्ये घुसू दिलं तर मी सरकारमधून बाहेर पडेन,” असे पाडवी म्हणाले.

Namdeo Kumbhar

  • शिंदे सेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी सरकारला कडक इशारा दिला.

  • “बंजारा, धनगर समाजाला आदिवासी आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडेन,” असे वक्तव्य.

  • नंदुरबार येथील सभेत त्यांनी आदिवासी हक्कांचे जोरदार समर्थन केले.

  • “आदिवासी होण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो” – पाडवींचा जोरदार युक्तिवाद.

  • आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता.

Aamshya Padvi warns of quitting Shinde-Fadnavis government if Banjaras and Dhangars get tribal reservation : राज्य सरकारच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण दिले तर सरकारमधून बाहेर पडेन, असा इशारा आमश्या पाडवी यांनी दिला आहे. आमदार असेपर्यंत कुणालाही आदिवासी आरक्षणात घुसू देणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणावरून पुन्हा राजकीय तणाव वाढला आहे.

आरक्षणासाठी सत्ताधारी आमदाराच आता मैदानात उतरले आहेत. शिंदे सेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी ग्रुप आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडणार आमदार आमश्या पाडवी यांनी सरकारला इशारा दिला. आदिवासींमध्ये बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला घुसू देणार नाही. हैदराबाद गॅझेट आला म्हणून कोणीही आदिवासी येणार असं होणार नाही. आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटात जन्म घ्यावा लागतो. बंजारा समाजाने कितीही आंदोलन केले तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाही. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या असतो त्यामुळे महाराष्ट्रात आदिवासींमध्ये कोणालाही घुसू देणार नाही, असे पाडवी म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारला ब्लॅकमेल करणं बंद करा. आदिवासी समाजातून धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळेस आम्ही समाजाच्या वतीने कायद्याची लढाई लढलो आणि जिंकलो. अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी काही निकष असतात हे निकष आम्ही ठरवले नसून राज्यघटनेने ठरवलेले निकष आहेत, असे पद्माकर वडवी म्हणाले.

बंजारा समाज हा या निकषात बसत नसल्यामुळे आजपर्यंत समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत समावेश करण्यात आलेले नाही. बंजारा समाजाला विमुक्त जाती अ’ मध्ये 3% आरक्षण असून आणि विमुक्त भटक्या जमाती अ.ब.क.ड. या चार घटक मिळून बंजारा समाजाला 11 टक्के आरक्षण आहे. बंजारा समाज राजकीय आरक्षण घेण्याच्या वेळेस ओबीसीच्या लिस्ट मधून आरक्षण घेतात, शैक्षणिक, नोकरी आणि इतर 11 टक्के आरक्षण घेतात.
पद्माकर वडवी, माजी मंत्री तथा आदिवासी नेते काँग्रेस

सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्यावे, बंजारा कृती समितीचा निर्धार..

सरकारच्या दोन सप्टेंबर २०२५ रोजीच्या जीआरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी 15 तारखेला जालन्यात बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबाद गॅजिटियरमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालय वरती हा मोर्चा धडकणार आहे. बंजारा कृती समितीच्या वतीने आज जालन्यात घेण्यात आली, या बैठकीमध्ये या मोर्चाचे नियोजन करण्यात आलं असून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता मूळ टक्केवारीतच ST प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली, असे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oral Cancer Symptoms : धुम्रपान करणाऱ्यांना शरीर देतं 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सावध अन्यथा गंभीर आजाराचा करावा लागले सामना

Maharashtra Live News Update: सोलापूर कर्देहळ्ळीला पावसाचा तडाखा

India W Vs Australia W: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ODIचा थरार, कधी अन् कुठे पाहू शकता, वाचा सविस्तर

Dal Tadka Recipe : घरीच बनवा परफेक्ट ढाबा स्टाइल दाल तडका, वाचा सीक्रेट रेसिपी

Garba Night Look: गरबा नाईटला दिसाल सगळ्यात खास, घाघरा-चोलीसोबत 'ही' अ‍ॅक्सेसरीज करा परिधान

SCROLL FOR NEXT