Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस, मंत्रिमंडळ बैठकांमध्ये घेतले 72 निर्णय, वाचा सविस्तर माहिती

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकांमध्ये कोणते निर्णय घेतले?

रामनाथ दवणे

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने बंडाचा झेंडा फडकावल्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या १३ बैठका घेतल्या. म्हणजेच १०० दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ७२ निर्णय घेतले. (Maharashtra Government latest News Update)

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकांमध्ये कोणते निर्णय घेतले?

  • पेट्रोलवर पाच रुपये तर डिझेलमध्ये तीन रुपये करामध्ये कपात

  • मेट्रो तीन साठी आरे येथे कारखेड करण्याचा निर्णय

  • एमएमआरडीएला 60000 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी मान्यता आणि शासन हमी

  • राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे 700 दवाखाना सुरू करणार

  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पैसे वाटप सुरू

  • अतिवृष्टीच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या परंतु जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देणार.755 कोटी रुपये देण्यास मान्यता.

  • औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यास मान्यता

  • नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास मान्यता

  • जलसंपदाच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी सुधारित खर्चांना मान्यता हजारो एकर जमिनीला फायदा होणार

  • शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये शिधावस्तूंचा संच देणार.दिवाळीमध्ये वाटप करणार

  • स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान दोन राज्यात सुरू

  • पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी. सध्या पोलिसांच्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु.

  • वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणव्यात, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देण्याचा निर्णय.

  • इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक अशी ७२ शासकीय वसतीगृहे सुरु करण्यास मान्यता.

  • इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय.

  • महाराष्ट्रात ९ लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा निर्णय. यानुसार नाशिक, जळगाव, सांगली, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, भिवंडी, पुणे येथे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येतील.

  • Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT