सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, पाटण या भागात पावसामुळे माेठ्या प्रमाणात वित्त हानी झालेले आहे. अनेक भागात दरडी काेसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पाटण तालुक्यात मिरगाव, आंबेघर येथे एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान पावसाचा जाेर सुरुच असून सातारा जिल्ह्यासाठी एनडीआरएफचे आणखी एक अतिरिक्त पथक जिल्ह्यात (आज, शुक्रवार) सायंकाळपर्यंत येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात पावसाने आठ जणांचा बळी घेतला आहे. पूराच्या पाण्यात 2 जण बेपत्ता आहेत तर 27 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (eight-died-in-landslide-patan-mahableshwar-wai-satara rain updates-sml80)
सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. बुधवारी रात्रीपासून आत्ता पर्यंत (शुक्रवार) झालेल्या पावसामुळे अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले आहेत. काेयना धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी सुमारे 40 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पावसामुळे झालेल्या हानीची माहिती दिली.
शेखर सिंह म्हणाले सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेरघर, हुंबरळी, ढाेकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. सध्यस्थितीत मिरगाव येथील एक व्यक्ती, रेगंडी (ता. जावली) येथील दाेन, काेंढावळे (ता. वाई) येथील दाेन, जाेर येथील दाेन धावरी येथील एक अशा आठ जणांचा बळी गेला आहे. जावली तालुक्यातील रेंगडी गावात दाेन व्यक्ती पूराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे दाेन व्यक्ती बेपत्ता आहेत. काेंढावळे (ता. वाई) येथील पाच घरे मातीच्या ढिगा-यात दबलेली गेली. त्यातील 27 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
महाबळेश्वर तालुक्यात विक्रमी पावसाची नाेंद झाली आहे. येथे 594.04 मिली मीटर पाऊस झाला आहे. पाण्याचा प्रवाहामुळे येथील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे घरांचे व शेतीपिकाचे आणि सावर्जनिक मालमत्तेचे नुकासन झालेले आहे. सातारा जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज (शुक्रवार) सायंकाळ पर्यंत दाखल हाेईल असेही सिंह यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.