भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु : रावसाहेब दानवे  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु : रावसाहेब दानवे

रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे तोटा सहन करावा लागतोय. पंतप्रधान मोदींनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेली रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे खात्याला दिल्यानं रेल्वेचा कारभार रुळावर आलाय. असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

लक्ष्मण सोळुंके

जालना : भारतातील रेल्वे सध्या तोट्यात आहे. रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे तोटा सहन करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेली रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे खात्याला दिल्यानं रेल्वेचा कारभार रुळावर आलाय. असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

हे देखील पहा -

आज जालन्यात दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या भुयारी पुलाचं उद्घाटन आणि नवीन तसेच जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी येत असलेला तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचं देखील ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. खोतकर पिता-पुत्रांनी लोखंडी पुलाचं खोटं उद्घाटन करून जुना आणि नवीन जालना भागाला तोडण्याच काम केलं असून बाप बाप काढतो तर मुलगा खानदान काढण्यात गुंतल्याचं गोरंटयाल यांनी म्हटलंय. हा संस्कारातील फरक असल्याचा टोलाही गोरंटयाल यांनी खोतकरांना लगावला.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT