निविदा प्रक्रियेत अनियमितता; उच्चस्तरीय चौकशीची मागणी  Google
महाराष्ट्र

Education Scam: नवी मुंबई शिक्षण विभागाचा गलथान कारभार; 5 कोटींच्या निविदेचा पर्दाफाश

Corruption Exposed: निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि धोरणांच्या उल्लंघनामुळे शिक्षण विभागावर 5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेकायदेशीर सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या शिक्षण विभागाचा आणखी एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे. शिक्षण विभागाने टेंडर प्रक्रियेत शॉर्टकट मारून 5 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि धोरणांच्या उल्लंघनामुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.

नवी मुंबई मनपाच्या सर्व शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आणि आर्टिफिशीअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभारण्यासाठी राज्य सरकारने 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी पालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली.

परंतु, नियमानुसार शहर अभियंता आयटी विभाग, कार्यकारी अभियंता आयटी विभाग, लेखा अधिकारी आणि सल्लागार यांचा अभिप्राय घेणे आवश्यक असताना, हे सर्व पायऱ्या पूर्ण न करता निविदा प्रक्रिया सुरु केली गेली. यामुळे या प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी एक खाजगी संस्थेच्या शिक्षण विभागाच्या पांरपरिक निविदा प्रक्रियेतील संभाव्य गैरव्यवहाराबद्दल उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अभियांत्रिकी विभाग, लेखा विभाग आणि सल्लागार यांचा अभिप्राय न घेता संबंधित काम संबंधित संस्थेच्या घशात घातले गेले आहे. जरी अन्य कामांच्या निविदेमध्ये संबंधित विभागांचा किंवा अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला जातो, तरी या प्रकरणात ती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने पार पडली आणि यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT