ED Raid x
महाराष्ट्र

मोठी बातमी! भाजप नेत्यावर ईडीची कारवाई, नवी मुंबईतील ७० कोटींची संपत्ती जप्त

ED action latest news India : नवी मुंबई जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने भाजप नेते जेएम म्हात्रे यांची तब्बल ७० कोटींची संपत्ती जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग आणि वन विभागाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai forest land transfer money laundering case details : नवी मुंबईतील सरकारी जमिनीशी संबंधित एक घोटाळा उघड झाला असून त्यामध्ये भाजप नेत्याचं नाव समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने धडक कारवाई करत तब्बल ७० कोटींची संपत्ती जप्त केली. मनी लाँड्रिंग (पैशांची अफरातफर) प्रकरणात ईडीने भाजप नेत्याच्या मालकीचे तब्बल १८ कोटी रुपयांचे जमिनीचे भूखंड (Land Parcels) सोमवारी जप्त केले आहेत. आतापर्यंत त्यांची ७० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. ईडीने कारवाई केलेल्या भाजप नेत्याचे नाव जेएम म्हात्रे असे आहे.

ईडीने रायगड जिल्ह्यातील उलवे अन् उरण येथील म्हात्रे यांची संपत्ती जप्त केली आहे. पनवेल तालुक्यातील मौजा वहाळ येथील जमिनींशी संबंधित ईडीने कारवाई केली. सरकारी नोंदींमध्ये वन विभागाच्या मालकीच्या म्हणून नोंद आहे. पण या जमिनी बेकायदेशीरपणे व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केल्या गेल्याचा आरोप आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जातोय. या कारवाईमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईडी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

ईडीचा तात्पुरता जप्तीचा आदेश

ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत म्हात्रे यांच्या संपत्तीच्या जप्तीचा तात्पुरता आदेश दिला आहे. नवी मुंबईतील उरण आणि उलवे येथील जेएम म्हात्रे यांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांची किंमत अंदाजे ₹१७.७४ कोटी आहे. या मालमत्ता भाजप नेते जे.एम. म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. उरण आणि उलवेतील या मालमत्ता बेकायदेशीर व्यवहारांद्वारे मिळवल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत ही जमीन विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही.

नेमकं प्रकरण काय आहे ?

हे प्रकरण रायगडच्या पनवेलमधील एका एफआयआरमधून सुरू झाले. सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून, वनविभागाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर दाखवण्यात आली. त्यानंतर, नवी मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी हीच जमीन सरकारने संपादित केली तेव्हा त्याची भरपाई (Compensation) खऱ्या मालकाला (सरकारला) मिळण्याऐवजी खासगी व्यक्तींच्या खिशात गेली.

जे.एम. म्हात्रे कोण आहेत?

जे.एम. म्हात्रे हे बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपासून जेएम म्हात्रे हे भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वर्षे शेतकरी आणि कामगार पक्षा (पीडब्ल्यूपी) मध्ये काम केले होते. २०१५ मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी पनवेल नगर परिषदेचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. पनवेल, रायगडच्या स्थानिक राजकारणात त्यांना प्रभावी मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT