Maharashtra No 1 Marathi News Website 
महाराष्ट्र

Ek Number! देशातील वाचकांची ई-सकाळला पसंती, ‘कॉमस्कोअर’च्या अहवालात टॉपवर

India's No 1 Marathi News Website : ई-सकाळ हे सर्वाधिक लोकप्रिय पोर्टल ठरले आहे. ‘कॉमस्कोअर’नुसार हे देशातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल ठरलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेचा २५ वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय. यासह भारतातील क्रमांक एकची मराठी डिजिटल वेबसाइट ठरलीय. ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार ‘ई-सकाळ’ देशात सर्वाधिक वाचले जाते. ई-सकाळ हे भारतात सर्वाधिक वाचले जाणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. तंत्रज्ञान अन् नव्या माध्यमांचा योग्य वापर करत ई-सकाळनं यशाचं शिखर गाठलंय.

दर्जेदार मजकूर, निर्भीड-नि:पक्ष पत्रकारिता करणाऱ्या ई-सकाळ डॉट कॉमने प्रतिष्ठेच्या कॉमस्कोअर क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. ई-सकाळ डॉट कॉम हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारी न्यूज वेबसाईट आहे. दरम्यान देशातील विविध डिजिटल न्यूज पोर्टल्सचे युझर्स आणि इतर तांत्रिक माहिती यासाठी कॉमस्कोअरचा रिपोर्ट विश्वासार्ह मानला जातो.डिजिटल पत्रकारिते ई-सकाळने प्रमुख मराठी डिजिटल माध्यमांमध्ये दमदार कामगिरी करत अव्वलस्थान गाठलंय.

अशी आहे आकडेवारी

लोकमत ११ मिलियन

लोकसत्ता ६.८ मिलियन,

टीव्ही९ मराठी ७.४ मिलियन

एबीपी माझा ७.२ मिलियन या संकेतस्थळांना मागे टाकत राज्यातील वाचकांच्या मनामध्ये जागा निर्माण करत. तर Comscoreच्या रिपोर्टनुसार ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्स मिळाले आहेत.

तर डिजिटल माध्यमातील नव्या पर्वाची सुरुवात २६ जानेवारी २००० रोजी केली. त्याकाळी इंटरनेट नव्याने विकसित झाले होते. सकाळने दूरदृष्टी ठेवत ई-सकाळच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. Comscore हे डिजिटल मीडिया क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त व्यासपीठ आहे. जे विविध डिजिटल न्यूज पोर्टल्सचे प्रदर्शन, युजर्सची गणना करते. Comscoreच्या ताज्या रिपोर्टनुसार, ई-सकाळ हे सर्वाधिक लोकप्रिय साईट बनलीय. वाचकांचा विश्वास प्राप्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

SCROLL FOR NEXT