नगरपालिकांच्या निवडणुकीत घराणेशाहीवरून नेत्यांच्या घरात 'कहीं खुशी, कहीं गम' अशी स्थिती आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचं नेमकं काय झालं?
चाळीसगाव, जळगाव
भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण नगराध्यक्ष
मुक्ताईनगर, जळगाव
भाजपला धक्का देत शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील नगराध्यक्ष
बुलढाणा
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांचा विजय
खामगाव, बुलढाणा
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर नगराध्यक्षपदी
संगमनेर, अहिल्यानगर
आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबेंचा नगराध्यक्षपदी विजय
धामणगाव रेल्वे, अमरावती
भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे-अडसड नगराध्यक्ष
पुसद, यवतमाळ
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदी विराजमान
सिल्लोड, संभाजीनगर
माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर नगराध्यक्ष
दुसरीकडे भाजप वारंवार घराणेशाहीला स्थान नसल्याचा दावा केला असला तरी, घराणेशाहीच्या टक्केवारीत भाजपचीच आघाडी असल्याचं समोर आलंय...नगरपालिकेच्या निवडणुकीत 70 पेक्षा अधिक उमेदवार घराणेशाही चालवत होते... त्यात भाजपनं सर्वाधिक 30 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं होतं...
खरंतर देशात 149 कुटुंबाकडे तर राज्यात 23 कुटुंबाकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत... त्यात आणखी 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिलीय.. हे कमी होतं की काय आता नगरपालिकेत एकाच कुटुंबात अनेकांना उमेदवारी देण्यात आली... त्यामुळे मतदारांनीही घराणेशाहीला कौल दिला असल्यानं पुढची पाच वर्ष कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सतरंज्यांचा भार अटळ आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.