Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Gangapur Dam: गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदामाई प्रवाही झाली आहे.

Shivani Tichkule

Nashik News: नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. पण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून शुक्रवार (28 जुलै) रोजी 539 क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. (Maharashtra News)

गंगापूर (Gangapur) धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नाशिकमध्ये गोदाघाट आणि रामकुंडाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदामाई प्रवाही झाली आहे.

नाशिकमध्ये (Nashik) आलेले भाविकही गोदेच्या पाण्यात आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. गंगापूर धरण जवळपास 74 टक्के भरले असून सद्यस्थितीमध्ये धरणातून 539 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय.

मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

दुसरीकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही वेळा मुसळधार सरी कोसळत असल्याने इगतपुरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी दुपारी 12 वाजता 539 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

इतर धरणाची स्थिती

- दारणा धरण 78.14%

- मुकणे धरण 64.65%

- भावली धरण 100%

- गंगापूर धरण 73.57%

- कश्यपी धरण 40.17%

- पालखेड धरण 50.38%

- ओझरखेड धरण 27.14%

- पुणेगाव धरण 48.64%

- नांदूर मधमेश्वर 54.47%

- चनकापूर धरण 47.63%

- हरणबारी धरण 93.48%

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Bite: कुत्रा चावल्यावर दुर्लक्ष करू नका! 15 मिनिटांत करा 'हे' काम, अन्यथा रेबीजचा धोका वाढेल

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT