महाराष्ट्र

भाव पडल्याने शेतकऱ्याने वांग्याचे पीक उपटून फेकले

साम टीव्ही न्यूज .

अहमदनगर : वांग्याचे भाव कोसळल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर वांग्याची झाडे उपटून फेकण्याची वेळ आली आहे. लोणी खुर्द (ता. राहाता) येथील संतोष भानुदास घोगरे यांनी दीड एकरात देशी वाणाची चार हजार झाडे शेतमजुराकडून उपटून घेऊन फेकली.

वांग्यावरील रोग आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू असतानाच, पिकविलेला माल कुठे व कसा विकायचा, अशा कात्रीत शेतकरी सापडले. प्रचंड अडचणीतून पिकविलेल्या व रोगराईतून वाचविलेल्या वांग्यांना उठाव नसल्याने वांगी खराब होऊन ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

पिकावर केलेला खर्चही वसूल होईना. दोन वर्षांपूर्वी वांग्याचे चांगले पैसे झाले होते. यंदाही भाव वाढतील, या आशेवर त्यांनी पीक टिकविले आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सर्वाधिक मागणी असलेले व उत्पादन जास्त असलेले वांग्याचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले.

सात्रळ येथील प्रमोद नालकर व दाढ बुद्रुक येथील विजय तांबे म्हणाले, की भाजी व भरतासाठी स्वादिष्ट अशा देशी वाणाचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढत आहे. एक-दीड एकरांपासून पाच एकरांपर्यंत वांग्याचे प्लॉट या भागात आहेत. या वर्षी निम्म्यापेक्षाही कमी, ८ ते १० रुपये प्रतिकिलो भाव वांग्याला मिळाला. वांग्यावर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वर्षी प्रथमच लाल मुंग्यांच्या हल्ल्यामुळे व हुमणी किडीमुळे झाडे खराब झाली. वाहतुकीवरील खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे झाडे उपटून फेकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT