Jalna Car Accident लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Car Accident | दारू पिऊन कार चालवणं पडलं महागात; तरुणासह कारचालक गंभीर जखमी

Jalna Car Accident : ही धडक इतकी जोरदार होती की, उभा असलेला तरुण अक्षरशः दहा फूट रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: मंठा-लोणार महामार्गावर मद्यधुंद (Drunked) कारचालकाने भरधाव वेगात गारटेकी फाट्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला उडविल्याची (Car Accident) घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी मंठा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jalna Car Accident)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील गारटेकी फाट्यावर उभ्या बसमधून उतरून फटावर उभ्या असलेल्या तरुणाला लोणारकडून मंठा शहराकडे जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार क्रमांक MH,14 -HY- 9911 चा चालक मधधुंद अवस्थेत भरधाव वेगात कार घेऊन जात असताना त्याचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने फटावर उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, हा तरुण अक्षरशः दहा फूट रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या अपघातानंतर तरुण गंभीर जखमी झाला. तर मद्यधुंद कारचालक आपल्या कारसह रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईपवर जोरदार धडकला. यात कारचालकही गंभीर जखमी झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, एक तास उलटूनही रुग्णवाहिका आली नसल्याने अखेर दोन तरुणांनी जखमी तरुणाला आणि कार चालकाला मंठा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी जखमी तरुण आणि कारचालक दोघांवर उपचार सुरू आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Pimples On Face: चेहऱ्यावर पिंपल्स येताहेत? ही चूक ठरतेय कारणीभूत, आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT