Satara News Saam tv
महाराष्ट्र

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

Satara Girl Viral Video : कराड-पाटण राज्यमार्गावर मद्यधुंद तरुणीने गाड्यांना अडवून धिंगाणा घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोलिसांनी धाव घेत तिला ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • मद्यधुंद तरुणीने रात्री रस्त्यावर मोठा गोंधळ घातला

  • गाड्या अडवणे, दगडफेक, बोनेटवर बसून धिंगाणा

  • सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • पोलिसांनी त्वरित कारवाई करून तरुणीला ताब्यात घेतले

साताऱ्यात भर रस्त्यात एका तरुणीने दारू पिऊन धिंगाणा घातल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सदर घटना ही कराड-पाटण राज्यमार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, कराड-पाटण राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ असताना मंगळवारी रात्री एका मद्यपी युवतीने विजयनगर येथील एमएससीबी चौकात धिंगाना घालण्यास सुरूवात केली. मोठं मोठ्याने आरडा ओरडा करत ही तरुणी रस्त्यावरून जाणाऱ्या गड्यांना, प्रवाशांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे.

शिवाय या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीला थांबवत त्या गाडीच्या बोनेटवर बसून धिंगाणा घातला. त्यानंतर तिने रस्त्याच्या मध्यभागी बसून अर्वाच्च भाषेत आरडा ओरडा केला. ही मद्यधुंद तरुणी दिसेल त्या वाहनाला लक्ष करून थांबवायची. याशिवाय येणाऱ्याजाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक सुद्धा केली. याघटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती.

यादरम्यान या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार कराड शहर ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला ताब्यात घेत घटनास्थळावरील वाहतूक पूर्वरत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT