Maharashtra drought-hit farmers receive Rs 3164 relief aid; political accusations follow. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Maharashtra Farmers Relief Package : निम्मा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाने हवालदिल झालाय. अशा स्थितीत सरकारने मदतीची घोषणा केलीय. मात्र ही मदत खरंच पुरेशी आहे का? आणि मदतीवरुन कसे आरोप-प्रत्यारोप रंगलेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • सरकारने ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी ३१६४ रूपयांची मदत जाहीर केली.

  • शेतकऱ्यांनी ही मदत अपुरी असल्याचं सांगून नाराजी व्यक्त केली.

  • विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका करून आरोप-प्रत्यारोप सुरू केले.

हा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे लातूरच्या महिलेचा.. पोटच्या लेकरासारखं जपलेलं सोयाबीनचं पीक अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालंय.आणि शेतकरी महिलेनं जीवाच्या आकांतानं टाहो फोडला. खरं तर अतिवृष्टीने मराठवाड्यासह राज्यातील 30 जिल्ह्यातील पीकं उद्ध्वस्त झालीयेत. पुरानं गावं वेढले आहेत. काही जनावरांनी दावणीलाच जीव सोडलाय. तर काही वाहून गेलेत. घरं पडलेत. अनेक शेतकऱ्यांचा संसारच मोडून पडलाय. अतिवृष्टीच्या तडाख्यानं शेतकरी पार कोलमडून गेलाय.

राज्यातील ३० जिल्हयांना याचा फटका बसला असून ७० लाख एकरवरील पीकं उद्ध्वस्त झालीयेत..यात ११ जणांचा मृत्यू झाला असून १४४ जनावरांचा जीव गेला असून ३२५ घरांच नुकसान झालं आहे. एकीकडे 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांची 70 लाख एकरवरील शेती उद्ध्वस्त झालीय. त्यासाठी 2215 कोटींची मदत जाहीर केलीय. त्यामुळे आम्ही 2215 कोटी रुपयांची 70 लाख एकरसाठी विभागणी केली. त्यातून ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची अवघ्या 3164 रुपयांवरच बोळवण करण्यात आल्याचं समोर आलंय.

सरकारची ही मदत म्हणजे बळीराजाची थट्टा असल्याचं विरोधक म्हणत असताना दुसरीकडे सरकारने मात्र ओला दुष्काळ जाहीर न करता आश्वासनावरच नुकसानग्रस्तांची बोळवण केलीय. सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत किमान 30 हजार रुपये एकरी खर्च येतो. मात्र अवघी 3 हजार 164 रुपये प्रति एकरी मदत देऊन सरकारने बुडत्या स्वप्नांवर नवा तडाखा दिलाय. खरं तर सरकारला मायबाप म्हटलं जातं. त्यामुळे सरकारने मदत करावी, कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

RPI Worker Clash : रामदास आठवलेंच्या पक्षात मोठा राडा; अध्यक्षपदावरून २ गटात तुफान हाणामारी, खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या

SCROLL FOR NEXT