Dr. Narendra Dabholkar Case: The Verdict Of The Case Will Be Tomorrow After 10 Years 
महाराष्ट्र

Narendra Dabholkar Case Verdict: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप; विरेंद्र तावडे, विक्रम भावे, पुनाळेकरची निर्दोष मुक्तता

Dr Narendra Dabholkar Death Case Verdict By Pune Court: २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १० मे २०२४

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज १० वर्षांनी निकाल अखेर १० वर्षांनी लागला. २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज निकाल आला असून सचिन अंदुरे आणि कळसकर या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२ दोघांना जन्मठेप, ३ निर्दोष..

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी शरद कळसकर आणि सचिन अंडूरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने ५ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे तीनही संशयित आरोपी होते. यामध्ये वीरेंद्र तावडे याच्यावर कटकारस्थानाचा आरोप करण्यात आला होता. तर संजीव पुनाळेकर याने शस्त्र नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

कशी झाली होती हत्या?

डॉ.दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता.

असा झाला तपास?

या हत्या प्रकरणाचा प्राथमित तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर एसटीस आणि शेवटी सीबीआय या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला आहे. या गुन्ह्यात 72 साक्षीदार होते. यामधील फक्त २० साक्षीदार तपासून बाकीचे साक्षीदार वगळण्यात आले होते.

त्यानंतर आरोपी डॉ.विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. अखेर आज तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालाचे दाभोलकर यांच्या कुटुबियांनी स्वागत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात वडगाव शेरीत मोकाट सोडलेल्या कुत्र्याचा १२ वर्षीय मुलावर हल्ला

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT