चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च सुद्धा करु नका; औरंगाबादमध्ये १४ जणांवर कारवाई Saam Tv News
महाराष्ट्र

चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च सुद्धा करु नका; औरंगाबादमध्ये १४ जणांवर कारवाई

बालकांचा लैंगिक कृत्यासाठी वापर करणे, त्यांची छायाचित्रे, व्हिडीओ क्लीप बनविणे आणि ती प्रसारित करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

औरंगाबाद - चाईल्ड पॉर्नोग्राफीमध्ये कुणी सहभागी होत असेल तर सावधान. कारण तुमच्यावर पोलिसांची बारीक नजर आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणे, प्रसारित करणे जर आढळून आले तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. चाईल्ड पॉर्नोग्राफीमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. कारण फेसबुकसह वेगवेगळ्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणारे, तसेच दुसऱ्याला शेअर केल्यावरून औरंगाबाद शहरातील १४ जणांवर सायबर पोलिसांनी कारवाई केलीय. बालकांचा लैंगिक कृत्यासाठी वापर करणे, त्यांची छायाचित्रे, व्हिडीओ क्लीप बनविणे आणि ती प्रसारित करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. इंटरनेटवर चाईल्ड पॉर्नोग्राफी हा शब्द टाइप करण्यापासून ते चाईल्ड पॉर्नोग्राफी पाहणारे, प्रसार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सायबर पोलीस विभाग इंटरनेटवर नजर ठेवून आहेत. इंटरनेटवर चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केले तर पोलीस थेट तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतात. (Dont search child pornography, cyber police is watching you)

हे देखील पहा -

बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार समाजमाध्यमांवर बालकांच्या पॉर्नोग्राफीची क्लिप, छायाचित्रे अपलोड आणि डाऊनलोड करणे आणि ती प्रसारित करणे हा गुन्हा आहे. सायबर पोलिसांनी औरंगाबाद शहरात गतवर्षी ९ व या वर्षी ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटकही केली आहे. पोलिसांची अशा गुन्हेगारांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर नजर असेल सोबतच सध्याच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये पालकांनीही विशेष लक्ष दिले पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले.

पॉर्नोग्राफीकरिता बालकांचा उपयोग होऊ नये याकरिता अमेरिकेत व भारतात कडक कायदे आहेत. सोशल मीडियांच्या कंपन्यांचे सर्व्हर अमेरिकेत असल्याने तेथील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सपोलाइड चिल्ड्रन संस्था काम करते. इंटरनेटवर चाईल्ड पॉर्नोग्राफी हा शब्द सर्च करणे, डाऊनलोड करणे, अपलोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती केंद्र सरकारला पाठविली जाते. केंद्राकडून महाराष्ट्र सायबर सेलला त्या वापरकर्त्यांची माहिती, शिवाय त्याने अपलोड, डाऊनलोड केलेले वा प्रसारित केलेल्या सीडीसह एक टीप पाठविली जाते. नंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतील सायबर पोलिसांना ही माहिती पाठवण्यात येते. त्यामुळे अशा प्रकरणात जे कुणी असतील त्यांच्यावर पोलीस थेट कारवाई करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT